Posts

गौतम बुद्ध: आद्य मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक

Image
  दुःख मुक्तीचा मार्ग एकदा गौतम बुद्ध धम्मदेसना देण्यासाठी एका ठिकाणी थांबले होते. लोक त्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारत होते आणि बुद्ध त्यांना उत्तर देत होते. तिथे एका कोपऱ्यात एक माणूस शांत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव स्पष्ट दिसत होते. बुद्धांनी त्या माणसाला विचारले , " हे मानवा , तुला काय त्रास होत आहे ?" त्या व्यक्तीने थोडक्यात उत्तर दिले , " मला माहित नाही." बुद्ध म्हणाले “त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याकडे लक्ष दे मग त्यावर उपचार कर”. त्या माणसाने बुद्धांना विचारले , “ते कसे करायचे ? " गौतम बुद्ध म्हणाले , जवळच्या जंगलात जा आणि तेथून काही रोपे घेऊन ये. परंतु हे लक्षात ठेव की रोपे अशी असावीत की केवळ दोन ते चार पाने आलेली आणि सर्व झाडे वेगवेगळी असावीत. तो मनुष्य जंगलात गेला आणि बुद्धांच्या सूचनेनुसार काही झाडे उखडून आणली. गौतम बुद्धांनी त्याच्या हातातून एक वनस्पती घेतली आणि ती त्यास दाखवली आणि विचारले की ही कोणती वनस्पती आहे ? त्या व्यक्तीने सांगितले की ही एक अतिशय लहान वनस्पती आहे. त्याची पानेही खूप लहान आहेत , म्हणून ती कोणती वनस्पती